Header Ads

Raja Rammohan Roy - Social Reformer and Father of Indian Renaissance - राजा रामोहन रॉय.


आधुनिक भारताचे जनक, मानवतावादी समाजसुधारक,इंग्लंडला भेट देणारे पहिले भारतीयभारतीय प्रबोधनाचे जनक,आधुनिक भारताचे पूर्वज व पिता.
भारतात नवनिर्मिती व पुनर्जागरणाची १८ व्या शतकात ज्या महान व्यक्तीच्या कार्यापासून सुरुवात झाली ते म्हणजे नव्या युगाचे दूत, आधुनिक भारताचे प्रणेते राजा राममोहन रॉय. यांनी ब्रिटीश भारतातील सुरुवातीच्या काळात
समाजसुधारणे साठी खूप कार्य केलीत त्यांनी केलेली सर्व कार्य एकाच पोस्ट मांडणे शक्य नाही त्यामुळे याठिकाणी परीक्षेच्या दृष्टीने थोडक्यात महत्वाच्या घटना व कार्य देण्यात येत आहेत.
  • जन्म: २२ मे,१७७२ राधानगर,( जि.हुगळी बंगाल )
  • मृत्यू: २७ सप्टेंबर, १८८३
  • वडील: रमाकांत आई: तारिणीदेवी

जीवन प्रवास: वयाच्या ९व्या वर्षी अरबी व फारशी चे अध्ययन.
 १७९०: उत्तर भारत भ्रमण - बौद्ध तत्वाशी परिचय
 १७९९: बनारस ला जाऊन संस्कृत वर प्रभुत्व.
विविध धर्मग्रंथांचा अभ्यास: वेद, बायबल, कुराण.
भाषा प्रभुत्व : संस्कृत, बंगाली, हिब्रू, ग्रीक, फारशी, इंग्रजी, लॅटिन.
१८०३: ईस्ट इंडिया कंपनी मध्ये नोकरी - दिगबी बरोबर दिवाण म्हणून काम केले.
तरुणपणी त्याच्यावर इस्लामी संस्कृती व विचाराचा प्रभाव होता - इस्लामचा अभ्यास केल्यावर लोक त्यांना " जबरदस्त मौलवी" ( विद्वान ईश्वर शास्त्रज्ञ )म्हणून ओळखू लागले.
डेव्हिड हेअर च्या मदतीने आधुनिक शिक्षण देणारी शाळा.

लेखन कार्य:
·         १८०३ - तूहफत- अल - मुवाहिद्दिंन( एकेश्वर वाद्याची देणगी) - पाहिले पुस्तक मुर्शिदाबाद येथे फारशी भाषेत.
·         १८१५: वेदान्त सुत्रावरील शाकर भाष्याचे बंगालीत भाषांतर.
·         १८१६: वेदांत सार
·         गोदिया: बंगाली भाषेचे व्याकरण.
·         वज्रसुची या संस्कृत ग्रंथाचे भाषांतर.
·         शांतता व सौख्य मार्गदर्शक येशूची शिकवण - इंग्रजी पुस्तक - ख्रिश्चन सोडून इतरांनी येशूच्या नैतिक तत्वाचा स्वीकार करावा असे यात सांगितले.
·         चार वेद व पाच उपनिषदांचे बंगालीत भाषांतर केले.
वृत्तपत्रे :
·         १८२१: संवाद कौमुदी साप्ताहिक - बंगालीसमाजसुधारणा विषयक मताचा प्रसार करण्यासाठी.
·         मिरात - उल - अखबार - फारशी वृत्तपत्र.


राजा राममोहन रॉय यांच्या बद्दल विचार:
·         " सत्याचे नवे खंड शोधून काढणारा भारताचा कोलंबस " - निकोल मक्रीकल.
·         " अतिशय आदरणीय व मानवजातीच्या सेवेतील परमप्रिय सहकारी." - जेरेमी बेथम.

दिल्लीच्या मोघल बादशाह दुसरा अकबर यांनी राममोहन रॉय यांना " राजा" किताब दिला. राजा राममोहन रॉय यांनी बादशाह अकबर द्वितीय यांची पेंशन सुरू होण्यासाठी इंग्लंड मध्ये प्रयत्न केले.

राजा राममोहन रॉय यांचे विचार:

·

         " आणखी बरीच वर्षे हिंदुस्थानवर इंग्रजांचा अंमल राहिल्याने व त्यांचा सहवास लाभल्याने या देशास राजकीय स्वातंत्र्याचा मार्ग दिसू शकेल "

·         ब्रिटिशांचे राज्य म्हणजे " ईश्वरी कृपा ( Divine Dispensation) असे त्यांचे मत होते.

·         "प्रत्येक धर्माचे अंतिम उद्दिष्ट मानवी कल्याण हेच आहे."

·         “प्रेम,सेवा,व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ आहे ,असे समजून सर्वानी परस्परांशी व्यवहार करावा.

·         गणित व भौतिक शास्त्राचे शिक्षण घ्यावे, जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्ययनात च गुरफटून पडू नये .

  "

कार्य व कृती:
  • स्त्री दास्य विमोचानाची पहिली चळवळ सुरू केली.यामध्ये त्यांनी बालविवाह, बालहत्या केशवपन, जातीभेद सारख्या प्रथांना विरोध केला.
  • बालविवाह आणि सतीच्या चाली विरूद्ध कार्य केले व सतीची चाल हि धर्माविरोधी आहे असे धर्मग्रंथाचा आधाराने पटवून दिले.त्यांच्या या प्रयत्नाने इ.स. १८२९ मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेटिंक यांनी सतीची चाल बंद करण्यासाठी कायदा संमत केला.
  • १८२३ ला डॉ. अलेक्झांडर डफ यांच्या शाळेसाठी जागा व विद्यार्थी मिळवून देण्यासाठी मदत.
  • १८३१ मध्ये सिलेक्ट कमिटीच्या प्रश्र्नवलीला दिलेल्या उत्तरात अनेक प्रशासकीय व वित्तीय सुधारणा सुचवल्या.
  • दक्षता समिती स्थापन करून सती जाण्यासाठी बळजबरी होते का याकडे लक्ष दिले.

No comments

Powered by Blogger.