Header Ads

Preamble to the Constitution of India - भारतीय राज्यघटनेचा सरनामा.

Mpscify_Cover Photo- PREAMBLE of Indian Constitution





सरनामा /उद्देशिका /प्रस्तावना
·       राज्यघटनेच्या सुरुवातीला सरनामा असलेली जगातील पहिली राज्यघटना अमेरिका या देशाची आहे.
·       आधार: उद्दिष्टाचा ठराव पंडित नेहरू यांनी 13 डिसेंबर 1940 ला सादर केला व संविधान सभेने तो  22 जानेवारी 1947 रोजी तो संमत केला.
पूर्ण राज्यघटना अधिनियमित केल्यानंतर सरनामा अधिनियमित करण्यात आला

आम्ही भारतीय जनता, भारताचे एक एक
सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास
सामाजिक, आर्थिक व राजकीय
न्याय,विचार,अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य
दर्जा व संधीची समानता
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून
आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान स्वीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

घटक : ४
१.एक राज्यघटनेचा अधिकाराचा स्रोत : भारतीय जनता
२. भारतीय राष्ट्राचे स्वरूप : सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य.
३. राज्य घटनेचे उद्दिष्ट: न्याय स्वातंत्र्य समानता व बंधुता.
४. घटनेची स्वीकृती केलेली तारीख : 26 नोव्हेंबर 1949.

सरनाम्यातील तत्वे:
१. सार्वभौम :
  • भारत कोणत्याही देशावर अवलंबून नाही व व कोणत्याही देशाची वसाहत नाही.
  • भारत आपले क्षेत्र दुसऱ्या देशास देऊ शकतो तसेच दुसऱ्या देशाचे क्षेत्र अधिग्रहीत करू शकतो.
  • भारत 15 ऑगस्ट 1947 ते 26 जानेवारी 1950 या कालावधीदरम्यान - वसाहत (ब्रिटीश राष्ट्रकुल).
  • पाकिस्तान 1956 पर्यंत ब्रिटीश क्षेत्र होते.
Infographic- PREAMBLE of Indian Constitution

२. समाजवादी :
42 वी घटनादुरुस्ती 1976 ने समाविष्ट.
1955 मधील काँग्रेसच्या आवडी अधिवेशनात समाजवादी समाजरचनेच्या तत्त्वाचा ठराव संमत करण्यात आला.
भारताचा समाजवाद हा लोकशाही समाजवाद असून साम्यवादी समाजवादी नाही लोकशाही समाजवादाचा मध्ये मिश्र अर्थव्यवस्था असते.

इंदिरा गांधी यांच्यामते "भारताचा समाजवाद हा स्वतःची वेगळी ओळख असलेला समाजवाद आहे."

सर्वोच्च न्यायालयाच्या मते :
१. "लोकशाही समाजवाद दारिद्र्य अज्ञान अनारोग्य आणि संधीची विषमता दूर करते." (जी. बी.पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य खटला २०००.).
२. " भारतीय समाजवाद हा मार्क्सवाद व गांधीवाद यांचा मिलाफ असून गांधीवादी समाजवादाकडे झुकलेला आहे." (नाकारा विरुद्ध भारत सरकार खटला 1983).
३. धर्मनिरपेक्ष : सर्व धर्मांना समान सन्मान किंवा सर्व धर्माचे समान रक्षण,

पी.बी. गजेंद्रगडकर : " भारतामध्ये कोणताही राज्य धर्म नसेल तसेच ते धार्मिक,अधार्मिक किंवा धर्मविरोधी नसेल. सर्व धर्मांना समान स्वातंत्र्य असेल."

भारत कोणत्याही विशिष्ट धर्मास सार्वजनिक निधीमधून साहाय्य देणार नाही.


एच आर गोखले नुसार याचे दोन अर्थ होतात
१. प्रत्येक व्यक्ती हा कोणत्याही धर्माचे आचरण करण्यास मुक्त असेल
२. राज्य धर्माच्या आधारावर व्यक्ती किंवा गटाच्या विरुद्ध भेदभाव करणार नाही.

भारतातील धर्मनिरपेक्ष शेतीची संकल्पना सकारात्मक असून पाश्चिमात्य देशातील धर्मनिरपेक्ष संकल्पना ही नकारात्मक आहे.
लोकशाही राजकीय सामाजिक आणि आर्थिक लोकशाही अंतर्भूत.

डेमॉक्रसी : डेमॉस आणि क्रशिया - ग्रीक शब्दापासून निर्माती.
लोकशाहीचे प्रकार दोन
१. प्रत्यक्ष
२. अप्रत्यक्ष

१. प्रत्यक्ष लोकशाही :
राज्यकारभारात जनतेचा प्रत्यक्ष सहभाग उदाहरण स्विझरलँड
मार्ग : ४
  1. सार्वमत : सार्वजनिक मुद्द्यावर लोकांचे मत घेणे
  2. पुढाकार : क्षेत्रीय विवाद सोडविण्यासाठी लोकांनी विधेयकाचा प्रस्ताव विधानमंडळाचे पाठवणे.
  3. परत बोलविणे.
  4. सार्वत्रिक मतदान : प्रस्तावित कायद्याबाबत मतदारांनी प्रत्यक्ष मतदान करून ठरविण्याची प्रक्रिया.

२. अप्रत्यक्ष लोकशाही: लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी सर्वश्रेष्ठ अधिकार बजवितात. यालाच प्रतिनिधिक लोकशाही म्हणतात.

दोन प्रकार : संसदीय व अध्यक्षीय
संसदीय : कार्यकारी विभाग कायदेमंडळात जबाबदार असते.

वैशिष्ट्ये:
  • सार्वत्रिक प्रौढ मताधिकार.
  • वेळोवेळी निवडणुका.
  •  कायद्याचे राज्य.
  • स्वतंत्र न्यायव्यवस्था.
  • विशिष्ट कारणावरून भेदभाव न करणे.

सामाजिक लोकशाहीचा पाया असल्याशिवाय राजकीय लोकशाही टिकू शकणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.


 
लोकशाही पद्धतीचे प्रकार : २
राजेशाही व प्रजासत्ताक
१. राजेशाही: राष्ट्रप्रमुख वंशपरंपरागत.
उदा: ब्रिटन.
२. गणराज्य:
राष्ट्रप्रमुख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निवडला जातो.
उदा भारत, अमेरिका.
प्रजासत्ताक चा अर्थ राजकीय सार्वभौमत्व जनतेकडे आहे. विशेषाधिकार असलेला वर्ग देशात अस्तित्वात नाही. सार्वजनिक पदे कोणताही भेदभाव न करता सर्व नागरिकांसाठी खुली आहेत.

न्याय : सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय.
  • सामाजिक न्याय: जात,वर्ण,वंश,धर्म,लिंग इत्यादी घटकावर आधारित कोणताही सामाजिक भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान वागणूक कोणासही विशेषाधिकार नसणे मागासवर्गीय महिला यांच्या परिस्थितीत सुधारणा करणे.
  • आर्थिक न्याय:आर्थिक आधारावर भेदभाव न करणे, आर्थिक विषमता कमी करणे.
सामाजिक न्याय + आर्थिक न्याय = वितरणात्मक न्याय किंवा विभागणीचा न्याय.


  • राजकीय न्याय : समान राजकीय अधिकार, सर्व राजकीय पदासाठी समान संधी तसेच मत व्यक्त करण्याची समान संधी.
स्वातंत्र्य :
व्यक्तीच्या व्यवहारावर निर्बंध नसणे, प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासाला संधी देणे. हे स्वातंत्र्य निरंकुश नसून त्यावर बंधने आहेत.
समता :
दर्जा व संधी ची.
  • कलम १४ ते १८ - नागरी समता.
  • कलम ३२५ ते ३२६ - राजकीय समता.
  • कलम ३९ - आर्थिक समता.
बंधुत्व :
एकेरी नागरिकत्व या तत्त्वाने संवर्धित करण्याचा प्रयत्न.

एकता व एकात्मता :
  • एकता - मानसिक बाजू
  • एकात्मता - भौगोलिक/ प्रादेशिक बाजूचा समावेश
उद्दिष्ट : सांप्रदायिकता,प्रादेशिकता, जातीयता,भाषावाद, अलिप्ततावाद यासारख्या राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणाऱ्या घटकावर मात करणे.


सरनामा हा कायदेमंडळाच्या अधिकाराचा स्रोतही नाही व त्यांच्या अधिकारावर बंधनेही घालत नाही.
यातील तरतुदी न्यायालया द्वारा लागू करता येत नाही.

राज्यघटनेच्या प्रस्ताविकेत एकदाच घटना दुरुस्ती करण्यात आली आहे : 42 वी घटनादुरुस्ती 1976 : 'समाजवादी धर्मनिरपेक्ष व एकात्मता ' शब्दाचा समावेश
या घटनादुरुस्तीचा अंमल 3 जानेवारी 1977 रोजी झाला.

सरनामा राज्यघटनेचा भाग आहे की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निर्णय:


१. बेरुबारी युनियन खटला 1960 सरनामा घटनेचा भाग नाही.
"सरनाम्यातून घटनेतील विविध तरतूदी मागची सर्वसाधारण उद्दिष्टे समजून येतात आणि त्याद्वारे घटनाकारांचे विचार समजण्यास मदत होते." असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.

२. केशवानंद भारती खटला 1973 सरनामा राज्यघटनेचा भाग आहे.


केशवानंद भारती खटल्यांमध्ये सरनाम्यात घटना दुरुस्ती करता येते परंतु घटनेची मूलभूत चौकट बदलता येत नाही असा निर्णय देण्यात आला.

३. भारतीय जीवन विमा निगम विरुद्ध ग्राहक शिक्षण व संशोधन केंद्र खटला 1995 सरनामा राज्यघटनेचा एकात्मिक भाग आहे.

सरनामा बाबत विचार:
१." सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताकाची कुंडली आहे." के एम मुंशी.
२." राज्यघटनेचा सर्वात मुल्यवान भाग राज्यघटनेचा आत्मा राज्यघटनेची गुरुकिल्ली रत्न राज्यघटनेचे मूल्य जाणून घेण्यासाठी हे एक योग्य परिणाम आहे."
पंडित ठाकुरदास भार्गव.
३." सरनामा हे राज्य घटनेतील मुख्य तत्व आहे." अर्नेस्ट बार्कर
मुख्य तत्व कारण यामध्ये राज्यघटनेचा थोडक्यात व अर्थपूर्ण रित्या संपूर्ण सार दिला आहे.
अर्नेस्ट बारकर यांच्या प्रिन्सिपल ऑफ सोशल अॅण्ड पॉलिटिकल थेअरी या पुस्तकाच्या सुरुवातीला तो उद्धृत केला आहे.
४. सरनामा हा यु एस ए च्या डिक्लेरेशन ऑफ इंडिपेंडन्स प्रमाणे आहे. परंतु तो जाहीरनाम्या पेक्षा काहीतरी अधिक सुचित करतो. तो घटनेचा आत्मा आहे आणि त्यामध्ये आपल्या राजकीय जीवनाची प्रणाली मांडली आहे. यामध्ये एक दृढ निश्चय आहे आणि केवळ क्रांतीच तो बदलू शकेल." एम हिदायतूल्ला.
५." उत्कृष्ट गद्यकाव्य." पंडित ठाकुरदास भार्गव
६." अशाप्रकारचा केलेला एक सर्वोत्तम मसुदा." एम. व्ही. पायली.
७." राज्यघटनेचे ओळखपत्र आहे." नाना पालखीवाला
८." कल्याणकारी राज्याची अचंबित करणारी तत्वे." जेपी कृपलानी.
Powered by Blogger.