Header Ads

Mahatma Jyotirao Fule

महात्मा ज्योतीराव फुले
Mahatma Jyotirao Fule  -महात्मा ज्योतिबा फुले
महात्मा ज्योतिबा फुले

विद्रोही विचार मांडणारे आद्य सुधारक / समाजक्रांतिकारक / खऱ्या लोकशाहीचा शिल्पकार / महाराष्ट्राचे मार्टीन ल्युथर.



  • जन्म : ११ एप्रिल, १८२७, पुणे
  • मृत्यू : २८ नोव्हेंबर, १८९०, पुणे
  • आजोबा: शेरीबा,
  • वडील: गोविंदराव , आई: चिमणाबाई
  •  पत्नी : सावित्रीबाई
  •  मुलगा : यशवंत (दत्तक पुत्र )
  • मूळ गाव : कटगुण, जि. सातारा

ज्योतिबा यांचे पूर्वज कटगूणचे चौगले होते त्यांनी नंतर  खानवडी येथे स्थलांतर केले.
.. १८४० मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी सावित्रीबाई सोबत विवाह.

शिक्षण :
·         वयाच्या ७ व्या वर्षी खाजगी मराठी शाळेत प्रवेश – पंतोजी : विनायकराव जोशी
·         १८३८ मध्ये शाळेतून काढले.
·         .. १८४१ मध्ये उर्दू शिक्षक गफार बेग मुन्शी व धर्मोपदेशक लिजीट साहेब यांच्या प्रयत्नाने ज्योतिबाच्या शिक्षणास पुन्हा सुरुवात - स्कॉटिश मिशनरी स्कूल - पुणे येथे.
·         ज्योतीबानी ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला.
·         शालेय जीवनात ज्योतीबावर छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वाशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव होता.
·         ज्योतीबांचे सहकारी - सदाशिव बल्लाळ गावंडे, सखाराम परांजपे, केशवराव मवाळकर, मोरो विठ्ठल वाळवेकर, लोखंडे व उस्मान शेख.

समाजकार्य :
·         मुलींसाठी शाळा सुरु करण्यामागची प्रेरणा हि अहमदनगरच्या मिस. फरार बाईनी मुलीसाठी सुरु केलेल्या शाळेची होती.
·         स्त्रीशिक्षण : इ.स. १८४८ ला पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा काढली.(हि शाळा सुरु करताना त्यांनी विचार मांडला -
"मी पुण्यात येताच कनिष्ट वर्गातील मुलींसाठी एक शाळा सुरु केली, मात्र त्या शाळेत ज्या मुलांना शिक्षणाची आवड असेल त्यांनाही प्रवेश दिला. या शाळेत मी वाचन, अंकगणित,आणि व्याकरणाची मूलतत्वे शिकवीत असे.."

·         जुलै १८५१ ला बुधवार पेठ - चिपळूणकरांच्या वाड्यात - मुलींची दुसरी शाळा.
·         सप्टेंबर १८५१ - रास्ता पेठेत मुलींची तिसरी शाळा सुरु केली.
·         त्यानंतर इ.. १८५२ ला वेताळ पेठेत शाळा काढली.
·         सदाशिव गोवड्याच्या मदतीने बंद पडलेली शाळा पुन्हा सुरु केली.
·         दलितासाठी पहिले वाचनालय पुणे येथे सुरु केले.
·         इ.स.१८४८ : पुण्यातील बुधवार पेठेत जगन्नाथ सदाशिव हाटे व सदाशिव बल्लाळ गोवडे यांच्या मदतीने मराठा मुलांसाठी शाळा सुरु केली.
·         महिला विषयक कार्य : इ.. १८६४ मध्ये गोखालेच्या शेणावी जातीतील पहिला पुनर्विवाह घडवून आणला.
·         .. १८६८ ला बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्वता:च्या घरी स्थापना : चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी.
·         .. १८७७ व्हिक्टोरिया बालकाश्रमाची धनकवडी येथे स्थापना.
·         काशीबाई यांच्या यशवंत या मुलास दत्तक घेतले.
विशेष माहिती
  •  विष्णुपंत थत्ते : ज्योतीबानी काढलेल्या शाळेतील शिक्षक.
  •  केशव भिवराम भवाळकर : सावित्रीबाईंना शिक्षिकेच्या कार्याचे प्रशिक्षण दिले.
  •   ज्योतीबानी अस्पृश्यासाठी काढलेल्या शाळेत मुले आणण्याचे काम : लहुजी साळवे व राणोजी महार करत तसेच शिक्षकाचे कार्य : विष्णू मोरेश्वर,रामचंद्र मोरेश्वर, राघो सुखाराम,धुराजी अप्पाजी चांभार,केसो त्र्यम्बक,विठोबा बापूजी, विनायक गुणेश  धोंडो सदाशिव, गुणु राझुजी, ग्यानु शिवाजी, व गणू शिवाजी मांग
 
अस्पृश्योद्दार : त्यांच्या या कार्यासाठी दक्षिणा प्राईस फंडातून सहकार्य मिळत असे
·         फुलेना सामाजिक विषमतेविरुद्ध पेठून उठण्यास प्रेरित करणाऱ्या घटना
म्हणजे -
. वयाच्या ९ व्या वर्षी वैधव्य प्राप्त गुरु कन्येस समाजाने विद्रूप केले.
. ब्राम्हण मित्राच्या लग्नाच्या वरातीत झालेला अपमान.

·         .. १८५१ ला नाना पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली
·         .. १८५२ मध्ये वेताळ पेठेत दुसरी शाळा.
·         .. १८५८ अस्पृश्यांसाठी तिसरी शाळा
·         .. १८५८ महार मांग इ.लोकास विद्या शिकविणारी मंडळी ची स्थपना
·         .. १८६८ स्वत:च्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
·         .स. १८७३ ला अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रसिद्ध.
·         २४ सप्टेंबर, १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना :
·         शुद्रातिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक गुलामगिरी नष्ट करण्याच्या
उद्देशाने.( सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी या ग्रंथात सत्यशोधक
समाजाच्यातत्वाबाद्द्ल विवेचन दिले )
इतर कार्य:
·         .. १८७७ च्या दुष्काळात धनकवडी येथे दुष्काळपिडितांसाठी कॅम्प उघडले.
·         .. १८८८ ड्युक ऑफ कनॉट च्या समोर शेतकऱ्यांच्या पारंपारिक वेशात उपस्थितीत राहून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे दर्शन घडविले.
·         शेती सुधारण्यासाठी सरकारला  : तलाव,बंधारे, धरणे द्वारा शेतीला पाणी पुरवठा, पिकाच्या संरक्षणासाठी बंदुकीचे परवाने द्यावे, कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे, पशुपालनासाठी चालना द्यावी, सुधारित शेतीसाठी अवजारे,तसेच अल्पव्याजी कर्जे शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी. इ. सल्ले दिले.
·         .. १८६५ मध्ये तळेगाव ढमढेरे येथे न्हाव्यांचा संप घडवून आणला.
·         डिसेंबर, १८७३ मध्ये सीताराम आल्हाट व राधाबाई निंबकर यांचा सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला.
·         .. १८७५ - न्या.रानडे यांना दयानंद सरस्वती  यांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यास सहकार्य केले.
·         जुन्नर येथील शेतकऱ्यांचा सावकारशाही विरूद्धचा लढा यशस्वी केला.

लेखन कार्य :
·         .. १८५५ - तृतीय रत्न नाटक - यामध्ये पुरोहिताकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक मांडली.
·         .. १८६९ - छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, नाव - कुळवाडी भूषण.
·         .. १८६९ - ब्राम्हणाचे कसब हा पद्यात्मक ग्रंथ.
·         .. १८७३ - गुलागिरी ग्रंथ - हा ग्रंथ अमेरिकन जनतेस समर्पित केला.
·         .. १८८३ शेतकऱ्याचा आसूड.
·         .. १८८५ - सत्सार नियतकालिक.
·         .. १८८५ - इशारा.
·         .. १८९१ - सार्वजनिक सत्यधर्म - यामध्ये निर्मिकाची संकल्पना मांडली.
·         अस्पृश्याची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज. इ. लेखन कार्य केले.

ज्योतीबाबद्दल संकीर्ण माहिती :
·         पेशव्यांनी फुलेंच्या वडिलांना ३५ एकर जमीन इनाम दिली होती.
·         ज्योतीबानी लहुजी मांग यांच्याकडून दांडपट्टा व नेमबाजी चे प्रशिक्षण घेतले होते.
·         १८७६ ते १८८२ या कालावधीत पुणे नगरपालिकेचे सदस्य होते.
·         १८७७ ला दिनबंधू वृत्तपत्र सुरु करण्यास सहकार्य केले.

सत्कार :
·         .. १८५२ मध्ये त्यांनी केलेल्या शिक्षण कार्यामुळे पुण्यातील  विश्राम बागेत मेजर केनेडीच्या हस्ते.सत्कार
·         ११ मे, १८८८ - मुंबईच्या जनतेच्या वतीने मांडवी (कोळीवाडा) येथे झालेल्या सभेत  राव बहाद्दूर वडेकर  यांनी ज्योतीबाना महात्मा हि पदवी दिली.
विचार :
१८८९ च्या राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनात - " जो पर्यंत शेतकऱ्यांना राष्ट्रीय सभेत सामावून घेतले जात नाही तो पर्यंत राष्ट्रीय म्हणवून घेण्याचा अधिकार सभेस पोहचत नाही

ज्योतिबा बद्दल विचार - " "
·         " ज्योतिबा फुले या माळ्याने राष्ट्ररूपी बागेतील सामाजिक एकतेच्या वाढीला विरोध करणारी तणे, बांडगुळे उपटून तेथे फुलझाडांची उत्तम जोपासना केली." - धनंजय कीर.
·         “ सामाजिक सुधारणेच्या बाबतीत कृतीपूर्ण व अपूर्व असे नेतृत्व करणारे ज्योतीराव हेच पहिले नेते होते.” - धनंजय कीर
·         "ज्योतिबा फुले खरे महात्मा होते " - महात्मा गांधी
·         " हिंदुस्थानचा बुकर वाशिंग्टन " बडोदाधिपती सयाजीराव गायकवाड.
·         बाबासाहेबांनी - हू वेअर द शुद्राज ? (शुद्र कोण होते ) हा ग्रंथ फुले यांना समर्पित केला.
·         विष्णू शास्री चिपळूणकरानी महात्माफुले यांना “ शुद्र जगद्गुरू “ म्हटले .

Powered by Blogger.