जैन धर्म – संक्षिप्त इतिहास
जैन धर्म :
संस्थापक : ऋषभदेव भगवत गीता व विष्णू पुराणात यांना विष्णू चे अवतार म्हटले आहे.
जैन धर्माला खूप प्राचीन परंपरा आहे. या परंपरेनुसार जैन धर्मात २४ तीर्थकर होऊन गेले त्यापैकी प्रमुख तीर्थकर व त्यांचे प्रतीक चिन्ह व शिष्य :
क्रमांक |
तीर्थंकर |
प्रतीक चिन्ह |
शिष्य |
१ |
ऋषभदेव (आदिनाथ) |
सांड/ बैल पुंडरिक |
ब्राह्मी |
२ |
अजितनाथ |
हत्ती सिंहसेना |
फल्गु |
३ |
सम्भवनाथ |
घोड़ा चारू |
श्यामा |
४ |
अभिनन्दननाथ |
वानर वज्रनाभा |
अजिता |
५ |
सुमतिनाथ |
चकवा/ लाल हंस |
काश्यपी |
६ |
पद्मप्रभु |
कमल प्रद्योतना |
रति |
७ |
सुपार्श्वनाथ |
स्वस्तिक विदिर्भा |
सोमा |
८ |
चन्द्रप्रभु |
चंद्र दिन्ना |
सुमना |
९ |
पुष्पदन्त |
मगर वाराहक |
वारूणी |
१० |
शीतलनाथ |
कल्पवृक्ष |
सुजसा |
११ |
श्रेयान्सनाथ |
गेंडा कश्यप |
धरणी |
१२ |
वासुपुज्य |
म्हैस सुभूमा |
धरणी |
१३ |
विमलनाथ |
सूअर मंडरा |
धारा |
१४ |
अनन्तनाथ |
साही जस |
पद्मा |
१५ |
धर्मनाथ |
वज्रदण्ड अरिष्ट |
अर्थशिवा |
१६ |
शांतिनाथ |
हरीण चक्रयुद्ध |
सूची |
१७ |
कुन्थुनाथ |
बकरी संबा |
दामिनी |
१८ |
अरहनाथ |
मासा कुम्भ |
रक्षिता |
१९ |
मल्लिनाथ |
कळस अभिक्षक |
बन्धुमति |
२० |
मुनिसुव्रतनाथ |
कासव मल्लि |
पुष्पावती |
२१ |
नमिनाथ |
नीलकमल शुभ |
अनिला |
२२ |
अरिष्टनेमिनाथ |
शंख वारादत्ता |
यक्षदिन्ना |
२३ |
पार्श्वनाथ |
साप आर्यदिन्ना |
पुष्पचूड़ा |
२४ |
वर्धमान महावीर |
सिंह इन्द्रभूति |
चन्द्रबाला |
जैन तीर्थाकारांच्या जीवनाबद्दल माहिती भद्र्बाहुच्या कल्पसुत्रात दिली आहे.
दोन जैन तीर्थकर अरिष्टनेमिनाथ व ऋषभदेव यांचा उल्लेख ऋग्वेदात मिळतो. अरिष्टनेमि यांना कृष्णाच्या जवळील मानले जाते.
पार्श्वनाथ :
२३ वे तीर्थकर, वडील : अश्वसेन (काशीच्या इक्ष्वांकू वंशाचे राजा )
वयाच्या ३० व्या वर्षी सन्यास घेतला. यांनी त्यांच्या अनुयायांना चार प्रतिज्ञा दिल्या :
१. अहिंसा.
२. सत्य
३. अस्तेय
४. अपरिग्रह
महावीरांनी वरील चार सोबत पाचवी ब्राम्हचार्याची प्रतिज्ञा दिली. यांनाच पंचमहाव्रते म्हणतात.
वर्धमान
महावीर :
- जन्म : इ.स.पू ५४० मध्ये कुंडग्राम ( वैशाली ) येथे ज्ञातुक कुळात झाला.
- निर्वाण : इ.स.पू ४६८ म्ल्लराजा सृस्तीपाल च्या राजमहालात - पावापुरी ( राजगीर ), बिहार येथे वयाच्या ७२ व्या वर्षी.
- वडील : सिद्धार्थ (ज्ञातुक कुळाचे प्रमुख )
- आई : त्रीशलादेवी ( लीच्छ्वी कुळातील )
- पत्नी : यशोधा
- मुलगी : अन्नोजा प्रियदर्शनी.
- मोठा भाऊ : नंदिवर्धन.
- पहिले अनुयायी : जामील ( जावई )
- पहिली जैन भिक्षुणी : चंपा ( राजा दधीवाहन ची मुलगी )
वयाच्या ३० व्या वर्षी गृहस्थाश्रामाचा त्याग केला व १२ वर्षा नंतर वयाच्या ४२ व्या वर्षी जुम्बिक जवळ ऋजुपालिका नदीच्या किनारी साल वृक्षाखाली केवलज्ञानाची प्राप्ती. यामुळे लोकांनी त्यांना ‘ केवली’,’जिन,’व ‘महावीर’ अर्हत, निर्ग्रंन्थ अशा उपाध्या दिल्या.
कैवाल्यप्राप्ती नंतर त्यांनी ३० वर्षे लोकांना उपदेश करण्यासाठी भ्रमण केले. त्यांनी हे उपदेश अर्धमागधी या लोकभाषेत केले.
त्यांनी तीन तत्वांवर भर दिला त्यांना त्रीरत्ने म्हणतात :
१. सम्यक दर्शन, २. सम्यक ज्ञान, ३. सम्यक चरित्र.
अनेकान्तवाद हे वर्धमान महावीरांच्या तत्वज्ञानाचे गाभासुत्र होते.
महावीरांनी जैन संघाची स्थापना केली. सम्राट चंद्रगुप्त मौर्य हे थेर भद्र्बाहू या जैन संघाच्या सहाव्या प्रमुख आचार्यांच्या समकालीन होता.
महावीरांनी त्यांच्या शिष्यांना ११ गणधरा मध्ये विभाजित केले.
आर्य सुधर्मा एकमेव असा गंधर्व होता की तो महावीरांच्या मृत्युनंतर हि जिवंत राहिला व जैन धर्माचा पहिला थेर/उपदेशक बनला.
इ.स.पू ३०० मध्ये मगध मध्ये १२ वर्षाचा भयानक दुष्काळ पडला त्यामुळे भद्र्बाहू त्याच्या शिष्यासोबत कर्नाटक मध्ये निघून गेला परंतु काही शिष्य स्थुलभद्र सोबत मगध येथेच राहले. भद्रबाहू परत आल्यानंतर काही साधू बरोबर त्याचे वाद झाले व त्यातूनच जैन मत दोन पंथात विभागाला गेला
१. श्वेतांबर, ( पांढरे वस्त्र धारण करणारे )
२. दिगांबर ( नग्न राहणारे )
तत्वे :
जैन धर्मात ईश्वराला मान्यता नाही परंतु आत्म्यास मान्यता आहे.
कर्मवाद व पुनर्जन्म वर विश्वास आहे.
जैन धर्माने अध्यात्मिक विचारणा सांख्यदर्शन मधून घेतले आहे.
जैन धर्माने अध्यात्मिक विचारणा सांख्यदर्शन मधून घेतले आहे.
जैन धर्म मानणारे राजा : चंद्रगुप्त मोर्य, उदयन, कलिंग राजा खारवेल, राष्ट्रकुट राजा अमोघवर्ष, चंदेल शासक,
मैसूर च्या गंग वंशातील मंत्री चामुंड च्या प्रोत्साहनाने श्रवणबेलगोल येथे १० व्या शतकात मोठ्या बाहुबली ( गोमतेश्वर ) च्या मूर्तीची निर्माती करण्यात आली.
खजुराहो मध्ये जैन मंदिरांची निर्माती चंदेल शासकांनी केली.
मौर्योत्तर काळात मथुरा जैन धर्माचे प्रमुख केंद्र होते. मथुरा कलेचा संबंध जैन धर्माशी आहे.
जैन सभा :
क्र |
काळ |
ठिकाण |
अध्यक्ष |
१ |
इ.स.पू. ३०० |
पटलीपुत्र |
स्थुलभद्र |
२ |
६ वे शतक |
वल्लभी (गुजरात ) |
क्षमाश्रवन |
No comments