Header Ads

महाराष्ट्राचा भूगोल - प्रशासकीय व राजकीय ( Geography of Maharashtra )


महाराष्ट्राचा भूगोल - प्रशासकीय व राजकीय ( Geography of Maharashtra )

महाराष्ट्र हे पश्चिम भारतात वसलेले राज्य आहे. महाराष्ट्राने देशाच्या एकूण भूभागापैकी ९.३६ % भाग व्यापला असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे राजस्थान, (,४२,२३९ चौ. कि. मी.) मध्यप्रदेश (३,०८,३१३ चौ. कि. मी.) नंतर तिसऱ्या क्रमांकावरील राज्य आहे. लोकसंख्येच्या बाबतीत उत्तरप्रदेश खालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात महाराष्ट्राचा २५ % वाटा आहे तसेच २०१०-११ या वर्षात सकल देशांतर्गत उत्पन्नात महाराष्ट्राचा २३.२ % वाटा होता.


१ नोव्हेंबर, १९५६ रोजी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना झाली.

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे  १९६० रोजी झाली. स्थापनेच्या वेळी महाराष्ट्रामध्ये  ०४ प्रशासकीय विभाग (मुंबई -कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर ),२६ जिल्हे, २३५ तालुके, २८९ शहरे व ३,५७७ खेडी होती.सध्यस्थितीत  महाराष्ट्रात सहा प्रशासकीय विभाग, ३६ जिल्हे, ३५८ तालुके, ५३४ शहरे व ४३,६६४ खेडी आहेत.


१.      विस्तार

  • अक्षांश : १५° ३७उत्तर अक्षवृत्त ते २२° उत्तर अक्षवृत्त.
  •  रेखांश : ७२° ३६पूर्व रेखांश ते ८०° ५४पूर्व रेखावृत्त.

२.      आकार

  • सर्वसाधारण आकार त्रिकोणाकृती असून त्याचा पाया दक्षिणेस कोकणात तर निमुळते टोक पूर्वेस विदर्भात आहे.

३.      क्षेत्रफळ, लांबी व रुंदी

  • क्षेत्रफळ: ३०७७१४ चौ.किमी.
  • लांबी : पूर्व -पश्चिम : 800 किमी.
  •  रुंदी : दक्षिण - उत्तर : 720 किमी.
  • समुद्रकिनारा :  720 किमी. लांबीचा आहे.

महाराष्ट्र राज्याची संक्षिप्त माहिती :

 

द्विभाषिक मुंबई राज्य

१ नोव्हेंबर १९५६

 

महानगर पालिका

२७

 १

स्थापना

१ मे १९६०

 ७

नगर पालिका

२३४

 २

राजधानी

मुंबई

 ८

नगरपंचायत

१२४

 ३

उपराजधानी

नागपूर

 ९

जिल्हा परिषद

३४

 ४

प्रशासकीय विभाग

 १०

पंचायत समिती

३५१

 ५

जिल्हे

३६

 ११

ग्रामपंचायत

२८३३२

 ६

तालुके

३५५ + ३

 १२

कटक मंडळ


नैसर्गिक सीमा :

- वायव्येस : सातमाळा डोंगररांगा, गाळणा टेकड्या व सातपुडा रांगेतील अक्राणी टेकड्या.

- उत्तरेस : सातपुडा पर्वतरांगा व त्याचा पूर्वेस गाविलगड टेकड्या.

- ईशान्येस : दरेकसा टेकड्या.

- पूर्वेस : चिरोली टेकड्या व भामरागड डोंगर.

- दक्षिणेस : पठारावर हिरण्यकेशी नदी व कोकणातील तेरेखोल नदी.

- पश्चिमेस : अरबी समुद्र.


राजकीय सीमा व सरहद्द :

महाराष्ट्राला एकूण ६ घटकराज्ये व १ केंद्रशासित प्रदेशांची सीमा लागून आहे. महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा व सर्वाधिक जिल्हे मध्यप्रदेशाला लागून आहेत .महाराष्ट्रातील एकूण २० जिल्ह्यांची सीमा इतर राज्यांना लागून आहे. तर १६ जिल्ह्यांची सीमा इतर कोणत्याही राज्यांना लागून नाही.

 

  • वायव्येस : गुजरात व दादरा नगर हवेली.
  • उत्तरेस : मध्यप्रदेश.
  • पूर्वेस : छत्तीसगड.
  • आग्नेयेस : आंध्र प्रदेश.
  • दक्षिणेस : कर्नाटक व गोवा.

 

राज्य व त्यांना जोडणारे महाराष्ट्रातील जिल्हे :

  1. मध्यप्रदेश (८): नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपुर, भंडारा, गोंदिया
  2. कर्नाटक (६): सिंधुदुर्ग,कोल्हापूर, सांगली,सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, ,
  3. तेलंगणा(४) : गडचिरोली, चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
  4. गुजरात (४) : पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे
  5. दादर नगर हवेली (२): ठाणे, नाशिक
  6. छत्तीसगड(२): गोंदिया, गडचिरोली
  7. गोवा (१) : सिंधुदुर्ग.

प्रशासकीय विभाग माहिती :

  • क्षेत्रफळाने सर्वात मोठा विभाग : औरंगाबाद | सर्वात लहान विभाग : कोकण.
  • सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग : औरंगाबाद.
  • सर्वाधिक तालुके : औरंगाबाद,  | सर्वात कमी तालुके : कोकण,

क्षेत्रफळनिहाय उतरता क्रम

  1. प्रशासकीय विभागांचा: औरंगाबाद > नाशिक > पुणे > नागपूर > अमरावती > कोकण.
  2. प्रादेशिक विभागांचा: विदर्भ > पश्चिम महाराष्ट्र > मराठवाडा > कोकण > खानदेश
  3. सर्वात मोठे जिल्हे :  अहमदनगर > पुणे > नाशिक,> सोलापूर > गडचिरोली
  4. सर्वात लहान जिल्हे : हिंगोली > ठाणे > भंडारा > मुंबई उपनगर > मुंबई शहर

विभाग

क्षेत्रफळ (चौ.किमी)

जिल्ह्यांची संख्या

समाविष्ट जिल्हे

क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा

क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा

तालुक्यांची संख्या

कोकण

३०७४६

मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

रत्नागिरी

मुंबई शहर

५०

नाशिक

५७४२६

नाशिक,अहमदनगर,धुळे,जळगाव, नंदुरबार.

अहमदनगर

नंदुरबार

५४

अमरावती

४६०९०

अमरावती, बुलढाणा,  अकोला,  यवतमाळ,  वाशिम.

यवतमाळ

वाशिम

५६

पुणे

५७२६८  

पुणे,सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर.

पुणे

कोल्हापूर

५८

नागपूर

५१३३६  

नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया.

गडचिरोली

गोंदिया

६४

औरंगाबाद

६४८२२  

औरंगाबाद,जालना, बीड, परभणी,  हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड.

बीड

हिंगोली

७६

 








जिल्हे निर्मिती :

क्रमांक

स्थापना वर्ष

मूळ जिल्हा

नवीन स्थापन जिल्हा

२७

1 मे 1981 :

रत्नागिरी

सिंधुदुर्ग

२८

औरंगाबाद

जालना

२९

16 ऑगस्ट 1982

उस्मानाबाद

लातूर

३०

26 ऑगस्ट 1982

चंद्रपूर

गडचिरोली

३१

1990

मुंबई

मुंबई उपनगर

३२

1 जुलै 1998

धुळे

नंदुरबार

३३

अकोला

वाशिम

३४

1 मे 1999

परभणी

हिंगोली

३५

भंडारा

गोंदिया

३६

1 ऑगस्ट 2014

ठाणे

पालघर


जिल्ह्यातील सारख्या नावाचे तालुके :-

अ.क्र

तालुके

जिल्हे

खेड

पुणे, रत्नागिरी

कर्जत

अहमदनगर  रायगड

कळंब

यवतमाळ  उस्मानाबाद

मालेगाव

नाशिक वाशीम

नांदगाव

नाशिक अमरावती

सेलू

परभणी वर्धा

कारंजा

वर्धा वाशीम

शिरूर

पुणे बीड

 

विभागनिहाय महानगरपालिका :

 

विभाग

मनपा संख्या

महापालिका

 

नागपूर

2

नागपूर चंद्रपूर

 

अमरावती

2

अमरावती अकोला

 

औरंगाबाद

4

औरंगाबाद परभणी लातूर नांदेड वाघाळा

 

पुणे

5

पुणे पिंपरी -चिंचवड सांगली -मिरज कुपवाडा सोलापूर कोल्हापूर

 

नाशिक

5

नाशिक अहमदनगर  मालेगाव धुळे जळगाव

 

मुंबई (कोकण)

9

बृहन्मुंबई ठाणे मीरा-भाईंदर कल्याण डोंबिवली नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर भिवंडी पनवेल

 

 

राज्यातील २७ वी व कोकण विभागातील ९ वी महापालिका रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे नव्याने स्थापन करण्यात आली आहे.

 

जिल्हा, कटकमंडळे

अहमदनगर,अहमदनगर कॅंटोन्मेंट बोर्ड

औरंगाबाद, औरंगाबाद कॅंटोन्मेंट बोर्ड

पुणे, देहू रोड, खडकी, पुणे

नाशिक, देवळाली

नागपूर, कामठी

 

 

 


No comments

Powered by Blogger.