Header Ads

Infrastructure in India - भारतातील पायाभूत सुविधा – रेल्वे


Economics notes mpsc,

भारतीय रेल्वे ही भारताची सरकार द्वारा नियंत्रित सार्वजनिक उपक्रम  आहे. ही आकारणे  आशिया खंडात प्रथम  व जगातील चौथी सर्वांत मोठी रेल्वे सेवा आहे. भारतात रेल्वे ही प्रवासी व मालवाहतुकीची सर्वात मोठी यंत्रणा आहे. भारतीय रेल्वेचे प्रवासी वाहतूक व मालवाहतूक असे दोन विभाग आहेत. यापैकी प्रवासी वाहतुकीचा वाटा सुमारे एक तृतीयांश असून मालवाहतुकीचा वाटा दोन तृतीयांश आहे. रेल्वेच्या उत्पन्नातील सर्वाधिक महसूल मालवाहतूकीतून येतो.

भारतीय रेल्वेचा इतिहास :
१८३६ : प्रायोगिक तत्त्वावर पहिली रेल्वे लाईन - चिताद्रेपटपूल (मद्रास ) : Red Hill Railway - इंजिन निर्माती - William Avery, Built by - आर्थर कॉटन.
१८४४ : लॉर्ड हर्डींग्ज : खाजगी तत्वावर रेल्वे उभारण्यास मान्यता.
१८४५ : Godhawary Dam Construction Railway - Rajahamahendri : आर्थर कॉटन ने बनविली.
८ मे, १८४५ : मद्रास रेल्वे स्थापन.
१८४५ : ईस्ट इंडिया रेल्वे स्थापन.
१८४५ : इंडियन रेल्वे असोसिएशन - जमशेदजी जिजिभाई व नाना शंकर शेट. GIPR मध्ये सहभागी.
१८४९ : GIPR ( Great Indian Peninsular Railway ) स्थापन.
GIPR ला रेल्वे स्थापन करण्यासाठी गॅरंटी सिस्टीम : मोफत जमीन व हमखास rate of return - ५% देण्यात आला.
१८५१ : Railway Built in Roorkee - Solani Aqueduct Railway.
१८५२ : अत्यावश्यक मद्रास रेल्वे कंपनी.

१६ एप्रिल, १८५३ - भारतातील पहिली रेल्वे - मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. यामध्ये १४ डबे, ४०० प्रवासी, अंतर २१ मैल ( ३३.८किमी.) वेळ : ४५ Min.
इंजिन : सिंध, साहीब व सुलतान.

१५ ऑगस्ट, १८५४ :  पूर्व भारतातील पहिली प्रवासी रेल्वे - हावडा ते हुगळी - २४ मैल. ईस्ट इंडिया रेल्वे ने सुरू केली.
१ जुलै, १८५६ : दक्षिण भारतातील पहिली प्रवासी रेल्वे -रोयापुरम / मद्रास ते Wallajah Road - ६० मैल, मद्रास रेल्वे ने सुरू केली.
१८५८ : ईस्टर्न बंगाल रेल्वे.
३ मार्च, १८५९ - दुसरी रेल्वे अलाहाबाद ते कानपूर दरम्यान धावली.
भारतीयाच्या मालकीची पहिली रेल्वे - (खाजगी) : लाहोर ते दिल्ली ( बेदी सन्स अँड कंपनी ) - बाबासाहेब दयाल बेदी.
१८६८ : राष्ट्रीयीकरण झालेली पहिली रेल्वे कंपनी - CSER ( Culcutta and South Eastern Railway ) - कारण : पुरामुळे झालेल्या नुकसानीमुळे.
२४ फेब्रवारी, १८७३ : पहिली ट्रमवे - Horse drawn tramway - Sealdah to Armenian Ferry Ghat - 3.8 km.
१८७४ : महाराष्ट्रात कुलाबा ते परेल दरम्यान ट्रामवे सुरू.
१८८२ पर्यंत भरतात ७५ खाजगी रेल्वे कंपन्या निर्माण झाल्या.
१८८९ : निजाम रेल्वे - राष्ट्रीयीकरण.
१९०० : GIPR चा ताबा घेतला.
१९२० : विल्यम अक्वर्थ समिती : रेल्वे बाबत शिफारशी करण्यासाठी.
सदस्य : १० : श्रीनिवास शास्त्री, पुरुषोत्तम दास ठाकुरदास व‌  राजेंद्रनाथ मुखर्जी हे‌ भारतीय सदस्य.
या समितीच्या शिफारशी नुसार १९२४ पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात. 2017 18 पासून स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बात करण्यात आला आहे.

१९२५ : GIPR & EIR या कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.
३ फेबरुवारी, १९२५ : पहिली इलेक्ट्रिक प्रवासी रेल्वे - व्हीटी ( व्हिक्टोरिया टर्मिनस ) ते कुर्ला दरम्यान सुरू झाली.

पंचवार्षिक योजना कालावधीमध्ये रेल्वे विकासावर सतत लक्ष देण्यात आले.
१.      १ ली पंचवार्षिक योजना : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क , पेरांबुर इंटिग्रल कोच फॅक्टरी.
२.      २ री पंचवार्षिक योजना : १९५६-डिझेल लोकोमोटिव्ह वर्क्स : वाराणसी.
३.      ६ वी पंचवार्षिक योजना : १९८३ - डिझेल इंजिन आधुनिकरण फॅक्टरी - पटियाला. 1985- रेल्वे कॉच फॅक्टरी: कपूरथला.
४.      १० व्या पंचवार्षिक योजनेत : राष्ट्रीय रेल्वे विकास योजना द्वारा रेल्वे आधुनिकीकरण व विद्युतीकरण  करण्यावर भर देण्यात आला.
५.      ११ व्या पंचवार्षिक योजनेत : रेल्वेच्या पायाभूत न्यूनतेवर भर देण्यात आला.

१९५१ मध्ये प्रशासकीय सोयीसाठी रेल्वेचे सहा विभागातील विभाजन करण्यात आले.
सद्यस्थितीमध्ये भारतात
रेल्वे विभाग : १७, रेल्वे स्थानक - ७२१६.
MPSCIFY_MPSC_Economics_Notes


Western DFC ( Dedicated Freight Corridor ) : JNPT ते दादरी - १५०४ किमी. ५ राज्यातून जाणार, कंटेनर वाहतूक या मार्फत होणार याचा प्रामुख्याने वापर हा कोळसा व लोह वाहतुकीसाठी होणार.
Eastern DFC : दानाकुनी ते लुधियाना - १८५६ किमी.
पूर्व-पश्चिम कॉरिडोर : कलकत्ता ते मुंबई - २००० किमी.
उत्तर-दक्षिण कॉरिडॉर :  दिल्ली ते चेन्नई - २१७३ किमी.
पूर्व किनार कॉरिडॉर : खरगपूर ते विजयवाडा ११०० किमी.
दक्षिण-पश्चिम कॉरिडॉर : चेन्नई ते गोवा ८७० किमी.

२०१६ मध्ये एकूण रेल्वे मार्ग ६६६८७ किमी. यापैकी ३५.३ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झालेले होते.
तर एकूण रेल्वे रूळ ९२०८२ किमी. यापैकी ४७.१ टक्के मार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे.
रेल्वे संबधी समित्या :
१.      अनिल काकोडकर समिती:  रेल्वे सुरक्षेसंबंधी सल्ला देण्यासाठी.
२.      श्री विवेक देवराय समिती : सप्टेंबर 2014 मध्ये रेल्वे मंडळाच्या पुनर्रचना संबंधित तसेच रेल्वे प्रकल्पासाठी स्रोत उपलब्धते संबंधित शिफारशी करण्यासाठी श्री विवेक देवराय यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंत्रालयाने एक समिती स्थापन केली समितीने जून 2015 मध्ये अहवाल सादर केला.
प्रमुख शिफारशी.
१.      रेल्वे मंडळाची पुनर्रचना करण्यात यावी.
२.      रेल्वे क्षेत्राचे उदारीकरण करून खाजगी क्षेत्रास प्रवेश देण्यात यावा.
३.      लेख्यांचे व्यवसायीकरण करावे.
४.      स्वतंत्र रेल्वे अर्थसंकल्प बाद करण्यात यावा. इ. शिफारसी करण्यात आल्या.

कोकण रेल्वे:
·        सुरुवात १९९० ( नोंदणी २६ जुलै,१९९०) यामध्ये ५१% रेल्वेचा वाटा. याचे काम २६ जानेवारी, १९९८ ला पूर्ण झाले.
·        एकूण अंतर ७६० किमी - रोहा ते मंगळूर.
·        मोठे पूल १७९,  लहान १८१९.
·        बोगदे  - ९२, सर्वात लांब बोगदा : करबुडे ६.५ किमी.
·        सर्वात लांब पूल : होणावर - शरावती नदी - २.०६५ किमी.  सर्वात उंच पूल : पानवल : ६४ मी.
·        कोकण रेल्वेचा वेग : १६० किमी/तास
·        १९९९ : पासून कोकण रेल्वेने रोल ओन रोल ऑफ योजना सुरू केली.

रेल्वे विकासातील समस्या :
१.      तंत्रज्ञानाची कमतरता.
२.      वाढते अपघात.
३.      अपुरे भांडवल इत्यादी.


Powered by Blogger.