Header Ads

Fundamental Duties in Indian Constitution - भारतीय राज्यघटना – मुलभूत कर्तव्ये



राज्यघटनेच्या भाग-4 मधील कलम 51 A मध्ये देण्यात आलेले आहेत.
स्रोत : U.S.S.R - कडून : मूलभूत कर्तव्य व सरनाम्यातील न्यायाची उद्दिष्टे ( सामाजिक, आर्थिक, राजकीय) स्वीकारण्यात आली आहेत.
घटनेत समावेश : 42 वी घटनादुरुस्ती 1976 सरदार स्वर्ण सिंह समिति शिफारस. या घटनादुरुस्तीने दहा कर्तव्य यांचा समावेश करण्यात आला.
2002 च्या 86 व्या घटनादुरुस्तीने अकराव्या कर्तव्याचा समावेश करण्यात आला.
मूलभूत कर्तव्ये फक्त भारतीय नागरिकास लागू आहेत.

अकरा मूलभूत कर्तव्य खालील प्रमाणे आहेत.

१. संविधानाचे पालन, संविधानाने पुरस्कारलेले आदर्श व स्थापन केलेल्या संस्था तसेच राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.
२. राष्ट्रीय स्वातंत्र्य लढ्यास प्रेरक ठरलेल्या उदात्त  आदर्शाची जोपासना करणे.
३. देशाचे सार्वभौमत्व ऐक्य व एकात्मता उन्नत राखणे व त्याचे संरक्षण करणे.
४. आव्हान केले जाईल तेव्हा देशाचे संरक्षण व राष्ट्रीय सेवेस तयार असणे.
५. धर्म, भाषा, प्रदेश, वर्ग भेद विसरून अखिल भारतीय जनतेत एकोपा व मातृभाव वाढवणे, महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा प्रथांचा त्याग करणे.
६. आपल्या संमिश्र सांस्कृतिक वर्षाचे मोल जाणून तो जतन करणे.
७. अरण्य सरोवरे नद्या चे संरक्षण करणे सजीव करण्याबाबत भूतदया दाखवणे.
८. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारक वृत्ती यांचा विकास करणे.
९. सार्वजनिक संपत्तीचे संरक्षण, हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे.
१०. व्यक्तिगत आणि सार्वजनिक अशा प्रत्येक क्षेत्रात उच्चतम पातळी गाठण्याचा प्रयत्न करून राष्ट्राची प्रतिमा सतत उन्नत होत राहील यासाठी प्रयत्नशील राहणे.
११. सहा ते चौदा वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. हे कर्तव्य 86 वी घटनादुरुस्ती 2002 ने समाविष्ट करण्यात आले.
मुलभूत कर्तव्ये - MPSCIFY
मुलभूत कर्तव्ये - MPSCIFY

मूलभूत कर्तव्य शी संबंधित खटले:
  1. चन्द्र भुवन बोर्डींग विरुद्ध मैसूर राज्य 1970
  2. एम सी मेहता विरुद्ध भारतीय संघ 1988. - आठवड्यातील एक तास पर्यावरणावरील प्रकरण शिकवण्यासाठी अत्यावश्यक करणे.
  3. मोहन कुमार सिंघानिया विरुद्ध भारतीय संघ 1992.

मूलभूत कर्तव्य शी संबंधित समिती :
  1. न्यायमूर्ती वर्मा समिती 1999.

Powered by Blogger.