Header Ads

Book List for MPSC State Service Pre Exam 2020

           ज्याप्रमाणे युद्धात जिंकण्यासाठी नुसतेच शूरवीर सैनिक असून भागत नाही तर त्यासाठी त्यांच्या जवळ अत्याधुनिक शस्त्रास्त्रे असणे आवश्यक आहे. त्याच प्रमाणे परीक्षेला सामोरे जाताना योग्य पुस्तकांचा वापर केल्यास हमखास यश मिळविणे शक्य होते. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना काही महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देणे खूप आवश्यक आहे. त्या म्हणजे
  • दर्जेदार पुस्तकांचे नियमित वाचन व रिव्हिजन  
  • प्रश्नपत्रिका सोडविण्याचा जास्तीत जास्त सराव
  • आयोगाच्या  मागील काही वर्षतील  प्रश्नपत्रिकांचे  विश्लेषण करणे.
वरील सर्व बाबींचा विचार करून  व बऱ्याच यशस्वी स्पर्धकांच्या चर्चेचा व मुलखती चा आधार घेऊन राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आवश्यक पुस्तकांची यादी पुढे  दिलेली आहे.

Book List - MPSC State Service Pre 2020 _ MPSCIFY
Book List - MPSC State Service Pre 2020



पेपर क्र. १ - सामान्य अध्ययन
इतिहास  
आधुनिक भारताचा इतिहास : डॉ. ग्रोवर व डॉ बेल्हेकर(एस.चंद)किंवा समाधान महाजन(युनिक अकादमी
 प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास : ल्युसेंट सामान्य ज्ञान/श्रीकांत जाधव (युनिक अकादमी ) 
महाराष्ट्राचा इतिहास : प्रा. अनिल कठारे .शालेय पाठ्यपुस्तके  - ५ वी, ८ वी, ११ वी चे  पाठ्यपुस्तके ( नवीन व जुने )
भूगोल :  
भूगोल व पर्यावरण – ए.बी.सवदी,महाराष्ट्राचा भूगोल – ए.बी सवदी किंवा खतीब. 
५ वी ते १२ वी चे पाठ्यपुस्तके
पर्यावरण : 
तुषार घोरपडे (युनिक अकादमी ),११ वी व १२ वी चे पाठ्यपुस्तके.
सामान्य विज्ञान : 
डॉ.सचिन भस्के , शालेय पाठ्यपुस्तके - ५ वी ते १० वी चे पाठ्यपुस्तके
अर्थशास्त्र : 
रंजन कोळंबे ( भगीरथ प्रकाशन )/डॉ.किरण देसले ( दीपस्तंभ प्रकाशन ), शालेय पाठ्यपुस्तके – ११ वी व १२ वी चे पुस्तके .
राज्यशास्त्र : 
 एम.लक्ष्मीकांत ( के.सागर प्रकाशन )/रंजन कोळंबे ( भगीरथ प्रकाशन )
पंचायत राज : 
किशोर लवटे (ज्ञानदीप प्रकाशन )
चालू घडामोडी : 
पृथ्वी परिक्रमा मासिक ( लगतच्या एका वर्षातील )


पेपर क्र .२
 आकलन :
  • अजित थोरबोले – CSAT Simplified 
  •  C-SAT  Decoded – सारथी प्रकाशन
             नियमित ३ ते ५ या वेळात ९ मराठी व १ इंग्रजी उतारे सोडविण्याचा सराव आवश्यक तसेच आठवड्यातून एक दिवस आयोगाची जुनी प्रश्नपत्रिका सोडविणे आवश्यक आहे.

अंकगणित व बुद्धीमापन : R S Agarwal Quantitative Aptitude + Logical Reasoning तसेच आयोगाने विविध परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांना स्वत:च्या पद्धतीने कमीत कमी वेळेत सोडविण्याची तयारी करणे आवश्यक.
इतर पुस्तके :
  • आयोगाच्या प्रश्न पत्रिकेचे विश्लेषण - Simplified Publication/ज्ञानदीप प्रकाशन / चोरमुले युनिक अकादमी या पैकी कोणतेही एक वारंवार वाचणे आवश्यक आहे. 
  •  शालेय पाठ्यपुस्तके नसतील तर ज्ञानदीप प्रकाशनाचे, महेश गारगोटे लिखित – स्टेट बोर्ड सिम्प्लिफाईड वाचावे .
Powered by Blogger.